सध्या व्हाट्सअप्प फेसबुकवर pink whatsapp नावाच्या अँप ची चर्चा होत आहे. ग्रुप वर मित्रांकडून या पिंक व्हाट्सअप्प ची लिंक शेअर होत आहे.
जर तुम्हाला पण अशा। प्रकारच्या लिंक ,मेसेज आले असतील तर सावधान हे pink whatsapp अँप नसून तो एक virus आहे जो की तुमच्या मोबाईल मधील माहितीची चोरी करतो.
सोशल मीडियावर फिरत असलेले pink whatsapp चे सर्व मेसेज खोटे व स्पॅम आहेत.
Viral मेसेज मध्ये सांगितलं आहे की
" नवीन फीचर्स सह पिंक व्हाट्सअप्प लाँच झाले आहे तुम्ही याचा वापर करून बघितलंच पाहिजे "
व सोबत एक लिंक दिली आहे.
जेव्हा तुम्ही या लिंक वर क्लिक करता तेव्हा खालील प्रकारची एक स्पॅम वेबसाईट ओपन होते व त्यावर pink whatsapp डोउनलोडिंग लिंक असते.
![]() |
| pink whatsapp |
एकदा तुम्ही हे अँप डाउनलोड करून इन्स्टॉल केले की तो virus तुमच्या फोन मध्ये प्रवेश करतो. व तुम्ही व्हाट्सअप्प वर पाठवलेला प्रत्येक मेसेज हा त्या pink whatsapp च्या हॅकर कडे जातो.
खूप जण डिलिट झालेले मेसेज, स्टेटस पाहण्यासाठी pink whatsapp , GB whatsapp, YO whatsapp सारखे app इन्स्टॉल करतात जे की तुमच्या मोबाईल साठी व व्यक्तीगत माहितीसाठी अतिशय धोकादायक असतात.
मित्रांनो,तुमच्या माहितीसाठी व्हाट्सअप्प च कोणतही नवीन अँप आलेलं नाहीये. व्हाट्सअप्प फक्त आणि फक्त हिरव्या रंगामध्ये आणि प्ले स्टोर वर उपलब्ध आहे. प्ले स्टोर व्यतिरिक्त इतर कुठेही मिळणारे अप्स हे स्पॅम व धोकादायक असतात.
![]() |
| pink whatsapp |
जर तुम्ही चुकून हे पिंक व्हाट्सअप्प डाउनलोड केलं असेल व तुमच्या फोन मध्ये ते app hide झालं असेल खालील स्टेप्स चा वापर करून तुम्ही त्याला मोबाइल मधून काढू शकता.
Setting >> apps >>
आता येथे तुम्हाला इन्स्टॉल केलेल्या app ची यादी दिसेल येथून तुम्ही अनोळखी अँप (pink whatsapp) डिलिट करू शकता.




0 टिप्पण्या