शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी : पीएम किसान चे पैसे जमा.

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी : पीएम किसान चे पैसे जमा. 



पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत १ एप्रिलपासून आता पर्यंत सुमारे ७,३८४ कोटी रुपये हे सरकारकडून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आले आहेत.

मार्च च्या शेवटच्या आठवड्यात मा. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी १.७ लाख कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज जाहीर केले. यावेळी त्यांनी देशातील ९ कोटींपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात एप्रिल च्या पहिल्या आठवड्यात दोन हजार रुपये पाठवण्याची घोषणा केली होती.

या योजनेअंतर्गत, शेतकऱ्यांना वर्षात दोन हजार रुपयांच्या तीन हफ्त्यात सहा हजार रुपयांची रक्कम मिळते, जी दर चार महिन्याच्या अंतराने जमा केली जाते.

नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवसापासून म्हणजेच १ एप्रिल पासून शेतकऱ्यांच्या खात्यावर याचा निधी पाठविला जात आहे. सरकारी सूत्रांनी सांगितले आहे कि, फक्त ६ दिवसात ४३% लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे हस्तांतरित  करण्यात आले आहेत.

लवकरच हि रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यातही  पोहोचणार आहे , काही इतर  शेतकर्यांच्या खात्यात अद्याप रक्कम पाठवली नाही, ज्यांना ३१ मार्चपर्यंत ४ हफ्ते मिळाले आहेत आणि आता त्यांना ५वा हफ्ता द्यावा लागणार आहे. अशा शेतकऱ्यांची संख्या एकूण ३.५ कोटी आहे.


पैसे जमा झाले कि नाही हे पाहण्याची लिंक

: . https://pmkisan.gov.in/GrivenceApplication/BeneficiaryStatus.aspx



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या