नवीन संगणक घेताना तुम्हाला नेहमीच हा प्रश्न पडतो की डेस्कटॉप घ्यावा की लॅपटॉप आज मी तुमचा हा प्रश्न कायमचा सोडवणार आहे.

अपग्रेड/मॉडिफिकेशन :

संगणकामध्ये upgrade ला खूप महत्त्व आहे संगणकासाठी रोज नवनवीन सॉफ्टवेअर आणि अपडेट येत असतात. व ते नवीन सॉफ्टवेअर अधिक चांगल्या प्रकारे चालण्यासाठी तुम्हाला तुमच्या संगणकामध्ये काही बदल करावे लागतात याला संगणक upgrade करणे म्हणतात.


तुम्ही लॅपटॉप मध्ये जास्त प्रमाणात आतील hardware upgrade करू शकत नाहीत.

रॅम सारख्या गोष्टी upgrade करता येतात परन्तु जागे अभावी तुम्ही ग्राफिक्स कार्ड, कुलिंग सिस्टिम इत्यादी upgrade नाही करू शकत.

याउलट डेस्कटॉप PC मध्ये तुम्ही हवे तेवढे बदल करू शकता नवनवीन प्रोसेसर, ग्राफिक्स कार्ड टाकू शकता.



लॅपटॉप/ डेस्कटॉप किंमत :

किमतीच्या बाबतीत बोलायचे झाले तर लॅपटॉप ची किंमत ही डेस्कटॉप पेक्षा जास्त असते.

जर तुम्ही 20000 रु. चा लॅपटॉप घेतला तर तुम्हाला एकदम साधा पेन्टियम प्रोसेसूरयुक्त लॅपटॉप मिळेल पण ह्याच 20000 रु. द्वारे तुम्ही इंटेल चा i3 प्रोसेसरयुक्त डेस्कटॉप घेऊ शकता.













हे हि पहा : 

लॅपटॉप/ डेस्कटॉप परफॉर्मन्स :


लॅपटॉप पेक्षा डेस्कटॉप चा परफॉर्मन्स चांगला असतो याचे कारण म्हणजे बॅटरी डेस्कटॉप pc ला अमर्याद वीज जोडणी असल्यामुळे तो हवी तेवढी ऊर्जा वापरून संगणकातील कामे जलद गतीने करतो.

याउलट लॅपटॉप मधील बॅटरी ही मर्यादित असल्यामुळे ती लवकर संपते आणि लॅपटॉप बॅटरी saving मोड वर असेल तर लॅपटॉप ची गती कमी होते म्हणजेच हवा तसा परफॉर्मन्स मिळत नाही.

लॅपटॉप च्या बॅटरी ची एक बॅटरी सायकल लिमिट असते ( लॅपटॉप 100% चार्ज केल्यानंतर परत वापर करून 0% चार्जिंग झाल्यास 1 बॅटरी सायकल पूर्ण होते ) 

ठराविक बॅटरी सायकल नंतर तुम्हाला लॅपटॉपची बॅटरी बदलावी लागते.






लॅपटॉप/ डेस्कटॉप पोर्टेबिलिटी :


डेस्कटॉप PC ला लॅपटॉप प्रमाणे इतरत्र कुठेही घेऊन जात येत नाही.

या बाबतीत लॅपटॉप अग्रेसर ठरतो याला तुम्ही कॉलेज, ऑफिस व इतर ठिकाणी अगदी सहजपणे घेऊन जाऊ शकता.

खासकरून जे कॉलेजमध्ये जाणारे विद्यार्थी आहेत त्यांना प्रोजेक्ट, प्रॅक्टिकल साठी लॅपटॉप सोबत न्यावा लागतो. त्यांच्यासाठी लॅपटॉप हा अधिक सोयिस्कर पर्याय ठरतो.



हे हि पहा : 

दमदार फिचर असणारे बेस्ट स्मार्टफोन्स अंडर १५००० । बेस्ट मिड रेंज स्मार्टफोन्स । Best Smartphones Under 15000 | Info-Tech Marathi इन्फो-टेक मराठी



लॅपटॉप/ डेस्कटॉप निष्कर्ष :


डेस्कटॉप कोणी घ्यावा ?

जर तुम्हाला असा संगणक पाहिजे जो चांगला परफॉर्मन्स देईल, जास्त काळ टिकेल, त्यामध्ये नियमित मॉडीफिकेशन्स (upgrade) करता येईल तर तुम्ही डेस्कटॉप pc सोबत जाऊ शकता.

तसेच जर तुम्हाला घर बसल्या काही काम आहे कामासाठी बाहेर जाण्याची आवश्यकता नसेल तुमच्यासाठी डेस्कटॉप अगदी योग्य आहे.

ज्यांना low budget गेमिंग साठी संगणक हवाय त्यांनी सुद्धा डेस्कटॉप pc घेतला पाहिजे कारण डेस्कटॉप pc ची किंमत ही लॅपटॉप पेक्षा खूप कमी असते.

लॅपटॉप कोणी घ्यावा ?

ज्या लोकांकडे जागेची कमतरता आहे जे लोक शिक्षण, नोकरीसाठी दुसऱ्या शहरात हॉस्टेल,रूम वर राहतात अश्यांसाठी लॅपटॉप हा योग्य पर्याय आहे.

चालत्या फिरत्या लोकांसाठी लॅपटॉप हा सर्वोत्तम पर्याय आहे.

लॅपटॉप मध्ये सुद्धा हलके व भारी प्रकार असतात साधे ऑफिस कामांसाठी 20000 हजारांपासून लॅपटॉप मिळतो.
तसेच गेमिंग व जास्त परफॉर्मन्स साठी 60000 पासून लॅपटॉप उपलब्ध आहेत.

शेवटी एवढंच सांगेल की तुमच्या गरजेनुसार तुम्ही लॅपटॉप किंवा डेस्कटॉप यांची निवड करा.