काही दिवसांपासून श्वेता दिदीचा ऑनलाईन क्लास चा व्हिडिओ VIRAL होत आहे. ऑनलाईन मीटिंग च्या वेळेस केलेल्या चुकांमुळे तिला आता पश्याताप करण्याची वेळ आली आहे.
तुमच्यावर देखील ही वेळ येऊ नये म्हणून खाली दिलेल्या नियमांचे पालन करा.
१. अनावश्यक परमिशन टाळा
जेव्हा तुम्ही एखादी मीटिंग किंवा ऑनलाईन क्लास करत असाल आणि त्यावेळेस माईक किंवा कॅमेऱ्या ची गरज नसेल तर तुम्ही तुमच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म ZOOM ,GOOGLE MEET, MICROSOFT TEAMS यांना तुमचा माईक ,कॅमेरा access करण्याची परवानगी देऊ नका.
ॲप ची permission बंद करण्यासाठी
1. ॲप वर जास्त वेळ दाबुन धरा.
2. App info वर क्लिक करा.
3. App permissions वर क्लिक करा.
4. कॅमरा व माईक ची परमिशन बंद करू शकता.
हे हि पहा :
डिलिट झालेले फोटो / फाइल्स असे परत मिळवा ? (How To Recover deleted files ? ) Info-Tech Marathi
२. SESSIONS / सत्रे तपासा
जेव्हा तुम्ही ऑनलाईन मीटिंग , क्लास डेस्कटॉप किंवा लॅपटॉप वरून अटेंड करत असता. तेंव्हा काहीवेळेस चुकीने तुम्ही एक मीटिंग दोन वेळेस जॉईन करता. त्यामुळे तुमची एक मीटिंग बॅकग्राऊंड टॅब मध्ये चालू असते व ते आपल्या लक्षात येत नाही. आणि जर त्या बॅकग्राऊंड मधील मीटिंग चा माईक / कॅमेरा ,चालू असेल तर तुमचा आवाज, विडिओ मीटिंग मध्ये येतो.
हे टाळण्यासाठी
- तुम्हाला आलेल्या मीटिंग लिंक वर एकदाच क्लिक करा.
- जर चुकीने 2 वेळेस मीटिंग जॉईन झाली असेल तर संपूर्ण browser बंद करून परत चालू करा.
३. कॅमेरा झाका
मीटिंग असो किंवा नसो तुम्ही नेहमी तुमचा लॅपटॉप चा कॅमेरा झाकून ठेवला पाहिजे. याचे 2 फायदे आहेत.
१. जर तुमची मीटिंग चालू झाली तर कधी कधी कॅमेरा अचानक चालू होतो व आपण त्यावेळेस मीटिंग साठी तयार नसतो. व आपल्याला अनावश्यक त्रास सहन करावा लागू शकतो.
२. हॅकर्स पासून बचाव : जर आपल्या लॅपटॉप/डेस्कटॉप वर काही मालवेअर, virus असतील तर हॅकर्स तुमचा कॅमेरा ऍक्सेस करू शकतात. त्यामुळे नेहमी लॅपटॉप/डेस्कटॉप चा कॅमेरा झाकून ठेवावा. Lenovo च्या काही लॅपटॉप मध्ये ही सुविधा कंपनी कडूनच दिलेली आहे.
४. हार्डवेअर सुरक्षा
आजकाल बाजारात माईक च्या वापरासाठी वेगळे बटण असणारे हेडफोन्स उपलब्ध आहेत.
अधिक सुरक्षेसाठी तुम्ही ते खरेदी करू शकता.
अधिक सुरक्षेसाठी तुम्ही ते खरेदी करू शकता.
यामध्ये तुम्ही तुमच्या earphone वरील बटनाचा वापर करून मायक्रोफोन चालू बंद करू शकता.
2 टिप्पण्या
Mast aahe he
उत्तर द्याहटवाdhanyawad
हटवा