image source : free image by pixbay.com
संरक्षित व शाश्वत सिंचनाची सुविधा निर्माण करण्यासाठी शेतकऱ्यांचे उत्पादन व उत्पन्नात वाढ होऊन शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी कोकण विभाग वगळुन सर्वच प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी (मागील 5 वर्षात एक वर्ष तरी 50 पैशापेक्षा कमी पैसेवारी जाहीर झालेल्या गावातील लाभार्थी या योजनेसाठी पात्र राहतील.) ही योजना सुरु करण्यात आली.
*योजनेसाठी प्रमुख अटी* :
▪ शेतकऱ्यांकडे त्याच्या नावावर कमीत कमी 0.60 हेक्टर जमीन असावी.
▪ लाभार्थी शेतकऱ्यांची जमीन शेतळयाकरिता तांत्रिकदृष्टया पात्र असणे गरजेचे आहे, जेणेकरून पावसाचे वाहणारे पाणी शेततळयात भरणे किंवा पुर्नभरण करणे शक्य होईल.
▪ अर्जदाराने यापूर्वी शेततळे, सामुदायिक शेततळे किंवा भात खाचरासोबत तयार होणारी बोडी या घटकांचा शासकीय योजनांमधून लाभ घेतला नसावा.
*आवश्यक कागदपत्रे* :
▪ जमिनीचा 7/12 उतारा
▪ 8 अ चा उतारा
▪ दारिद्र रेषेखालील कार्ड / आत्महत्याग्रस्त कुटूंबाच्या वारसाचा दाखला
*लाभाचे स्वरूप असे* : अनुदान (कमाल मर्यादा 50,000 रुपये /-)
*या ठिकाणी संपर्क साधावा* : तालुका कृषि अधिकारी कार्यालय
*संकेतस्थळ* : www.aaplesarkar.maharashtra.gov.in
📍 (टीप : वरील योजनेच्या नियमात किंवा आणखी काही बाबींमध्ये बदल असू शकतात. वाचकांच्या माहितीकरिता सदर माहिती संकलित करण्यात आली आहे. तरी काही त्रुटी वाटल्यास वाचकांनी पुनश्च एकवार खात्री करून घ्यावी.)
0 टिप्पण्या