बनावट संकेतस्थळ कसे ओळखावे ?
सध्या लॉकडाऊन मुळे लहान मुलांपासून जेष्ठांपर्यंत सव जण घरी बसून आहेत व या कारणामुळे लोकांचा अधिक वेळ मोबाईल, लॅपटॉप वर ऑनलाईन जात आहे आणि विद्यार्थी शिक्षणासाठी मोबाइलवर अवलंबून आहेत.
आणि याचाच फायदा काही लोक घेत असतात, आपण ऑनलाईन जे काही बघतो, डाउनलोड करतो याची खात्री न करता ते पटकन फॉरवर्ड करण्याची सवय आपल्याला लागली आहे. आणि अनोळखी वेबसाईटवरून स्वस्त किमतीत सामान मागवण्याचा लोभ सुद्धा अनेकांना असतो.
तर ऑनलाईन वावरताना काय काळजी घ्यावी व फेक गोष्टींपासून दूर राहून स्वतः सुरक्षित कसे राहावे ते पाहूया.
वेबसाईट चा URL तपासा:
फेक संकेतस्थळ ओळखण्यासाठी ही सर्वात पहिली व सोपी स्टेप आहे.
यामध्ये तुम्ही ज्या वेबसाईटला भेट देत त्या वेबसाईटचा url address म्हणजेच जर तुम्ही फेसबुक वापरत असाल तर त्यांचा URL FACEBOOK.COM किंवा FB.COM असतो.
त्यामुळे अन्य वेबसाईट ज्या दिसायला फेसबुक सारख्या दिसतात परंतु त्यांचा URL वेगळा असतो अशा WEBSITE फेक असतात व जर येथे तुम्ही तुमचे अकाउंट लॉगिन करण्याचा प्रयत्न केल्यास तुमचा फेसबुक पासवर्ड हॅकर कडे जातो.
HTTPS तपासा :
तुम्ही भेट देत असलेल्या वेबसाईट URL च्या सुरवातीला जर कुलुपाचे चिन्ह दिसत नसेल तर ती वेबसाईट तुमच्यासाठी धोकादायक आहे हे लक्षात घ्यावे व अशा वेबसाईटवर शॉपिंग करणे टाळावे व क्रेडिट, डेबिट कार्ड ची माहिती भरू नये.
Mcaffee सारखे antivirus व firefox सारखे browser अशा संकेतस्थळाला भेट देण्यापूर्वी धोक्याची कल्पना देतात.
अनोळखी ई-मेल पासून सावधान :
तुम्हाल येणाऱ्या अनोळखी ई-मेल वर आलेल्या लिंक वर क्लिक करू नका.
ई-मेल वर आलेल्या लिंक दिसायला सुरक्षित वाटत असल्या तरी त्या खऱ्या वेबसाईट नसतात अश्या लिंक ई-मेल मध्ये text ला हायपरलिंक देऊन बनवलेल्या असतात तुम्हाला चुकीच्या संकेतस्थळावर नेले जाते.
उदा. खाली दिलेली वेबसाईट ही फेसबुक ऐवजी गूगल वर नेते.
मेसेज शोधा :
तुम्हाला जर एखादा ई-मेल आक्षेपार्ह वाटत असेल तर आलेल्या ई-मेल मधील text कॉपी करून गुगल वर सर्च करा. तेथून तुम्हाला बरीच माहिती मिळेल.
शब्दरचना व व्याकरण तपासा:
बरेच मेसेज ,ई-मेल मधील कंपनीचे नाव व इतर गोष्टींमध्ये स्पेल्लिंग च्या चूका असतात जर अशा कोणत्या मेसेजद्वारे तुम्हाला तुमच्या बँकेचे डिटेल्स मागितले तर समजून जा की सदर मेसेज फेक आहे.
योग्य किंमत तपासा:
ऑनलाईन शॉपिंग करताना एखाद्या वेबसाईटवर एखाद्या प्रोडक्टवर खूप सार डिस्काउंट बघून आपण त्या वेबसाईटवर शॉपिंग करण्याचा विचार करतो. परंतु अशा वेबसाईट सुद्धा फेक असतात किंवा मागवल्या वस्तू कमी दर्जाच्या असतात व यामुळे तुम्हाला आर्थिक नुकसान होऊ शकते.
लक्षात ठेवा ₹5000 मध्ये कोणताही iphone मिळत नाही.
त्यामुळे ऑनलाईन शॉपिंग करताना 2 ते 3 वेबसाईटवर त्या वस्तूची किंमत नक्की तपासा व जास्तकरून प्रसिध्द व विश्वासू वेबसाईटवरुनच ऑनलाईन शॉपिंग करा.
1 टिप्पण्या
👍👍
उत्तर द्याहटवा